Bhosari : बस प्रवासात चोरी करणा-या तिघांना भोसरी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – पीएमटी बस, एसटी, रिक्षा अशा प्रवासात प्रवाशांचा किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून पाच गुन्हे उघडकीस झाले आहेत.

सोनी लखन सकट (वय 22), भाग्यश्री जितेश कसबे (वय 28) व सुनील श्रीकांत सोनवणे (तिघे रा. विश्रांतवाडी पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासात दागिने चोरी झाल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करत असताना कर्मचारी बाळासाहेब विधाते आणि सागर जाधव यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मालकाची ओळख पटवली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन महिला साथीदारांच्या मदतीने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार महिलांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी पाच गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचाकडून 3 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, संतोष महाडिक, संदीप जोशी, गणेश हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, सागर भोसले, विकास फुले या पथकाने कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.