Bhosari News : मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून (Bhosari News) 15 वर्षीय विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. हा प्रकार भोसरी येथील गव्हाणे वस्ती परिसरात 10 ते 13 डिसेंबर दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी भोसरीतील  दिघी रोडवरील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक हितेश शर्मा (वय 40 रा. गव्हाणे वस्ती भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मयत मुलाच्या आईने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Chakan News : पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिर्यादी यांचा मुलाला शर्मा हे शाळेत मारहाण करत होते, शाळेचा अभ्यासक्रम पुर्ण करत नाही, रस्टीकेट करतो, शाळेत पाठवू नका असा शारीरिक व मानसीकत्रास देत होते.याच दबावाने मुलाने राहत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.(Bhosari News) यावरुन मुख्याध्यापक शर्मा यांच्यावर कलम 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.