Chakan News : पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

एमपीसी न्यूज –  सोसायटीच्या पार्किंग मध्ये खेळणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या 42 वर्षीय नराधमाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.(Chakan News) हा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.24) सकाळी चाकण येथे घडला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चाकण पोलीसात तक्रार दिली असून पोलिसांनी पंकज प्रभाकर बाहेकर (वय42 रा. चाकण) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत होती. यावेळी फिर्यादीचे पती कंपनीत गेल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या मुलीला नाश्त्यासाठी आवाज दिला, मात्र खालून आवाज आला नाही, त्यावेळी फिर्यादी खाली गेल्या तर पार्किंगमध्ये मुलगी नव्हती.(Chakan News) त्यांनी शोधा-शोध केली असता आरोपीच्या घराबाहेर मुलीची चप्पल फिर्यादीला दिसली. फिर्यादी यांनी आवाज दिला दरवाजा वाजवला असता थोड्या वेळाने दरवाजा उघडला, त्यांची मुलगी बेडरुम मधून बाहेर येताना दिसली.

Wakad News : महाराष्ट्र क्रिकेट संघात वाकडची कन्या परिनिता पाटील हिची निवड

यावेळी आरोपीने ती घरात खेळत असल्याचे सांगितले. फिर्यादी मुलीला घरी घेऊन आल्या व विश्वासात घेऊन तिला विचारले असता तिने आरोपीनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे सांगितले.(Chakan News) सारा प्रकार फिर्यादीने त्यांच्या पतीला सांगितला. फिर्यादीच्या पतीने आरोपीला याबाबत जाब विचारला तर त्याने उडवा-उडवीची उत्तरे देत तो घरात लपून बसला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केले. आरोपी विरोधात चाकण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.