Bhosari : आठ दिवसांपासून वीज नसल्याने ‘आदर्श’ शिक्षण संस्थेतील विद्यार्थी त्रस्त

एमपीसी न्यूज – भोसरीतील आदर्श शिक्षण संस्थेमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज नाही. त्यामुळे शाळेची कामे खोळंबली आहे. महावितरणकडे वारंवार तक्रार करुनही दखल न घेतल्याने ‘महावितरणचा धिक्कार’ असो अशा घोषणा विद्यार्थ्यांनी महावितरण कार्यालयात दिल्या.

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या आठ दिवसांपासून आदर्श शिक्षण संस्थेमध्ये वीज नाही. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. संपूर्ण शाळेमध्ये दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होत आहे. पावसाचे दिवस आहेत. आरोग्याचा प्रश्न आहे.

  • शाळेच्या व्यवस्थापनाने महावितरणकडे लेखी तक्रार करुनही दखल घेतली नाही. यावेळी नगरसेविका प्रियंका बारसे आणि यांच्या नेतृत्वाखाली या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.