Pune : आदिवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट

कमिन्स इंडिया फाउंडेशन व पूर्णम इकोव्हिजन यांचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज – कमिन्स इंडिया फाउंडेशन व पूर्णम इकोव्हिजन यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जुन्या सायकली भेट प्रोजेक्ट अंतर्गत मंगळवारी (दि.30) आदिवासी विकास संस्थेची शिवाजी विद्यालय शाळा, डेहणे ता. खेड जि. पुणे या शाळेतील गरजू 20 विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या. 

तसेच रॉयल कॅस्टल हौ सोसायटी थेरगाव पुणेने त्यांच्या चालू स्थितीतील 81 ट्यूब लाईट स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्था व कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या वतीने डेहणे गावातील गरीब गरजू कुटुंबाला देण्यात आल्या. या शाळेतील विद्यार्थी हे 5-6 किमी अंतरावरून शाळेत पायपीट करतात या सायकलीचा त्यांना नक्कीच उपयोग होऊन त्यांना शाळेत येणे अधिक सोईस्कर होऊन त्याचा वेळ वाचणार आहे. तसेच ट्यूब लाईट मुळे गावातील कुटूंबाचे लाईट बिल कमी होऊन मुलांना ही अभ्यास करताना त्याचा फायदा होणार आहे.

या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक – मालघे सर, कमिन्समधील प्रदीप काकडे, संतोष जाधव, जितेंद्र साळुंखे, नारायण पाटील, नितीन साबळे व शाळेचे माजी विद्यार्थी गणेश हरसुले तसेच स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्थेचे अध्यक्ष रमेश जतकर, भाई ताम्हाणे व शाळेतील सर्व शिक्षक व गावकरी उपस्थित होते. सायकली व ट्यूब लाईट मिळाल्याबद्दल शाळेतील शिक्षकांनी व ग्रामस्थांनी आभार व्यक्त कमिन्सच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.