Susgaon News : ब्लास्टिंग मुळे सोसायटीतील फ्लॅट व कारच्या फुटल्या काचा, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ब्लास्टिंग मुळे सोसायटीतील फ्लॅट व कारच्या काचा फुटल्या, याप्रकरणी एका इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुसगाव, मुळशी येथे मंगळवारी (दि.19) सायंकाळी 4.30 वा ही घटना घडली.

याबाबत एका महिलेनं हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून महेंद्र ससार (रा. सुसगाव, मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सर्व्हे नंबर 43, 44, 45, 46 यामध्ये ब्लास्टिंग लावल्याने फिर्यादी यांच्या सोसायटीमधील फ्लॅट आणि कारच्या काचा फुटल्या. आरोपीने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली नाही तसेच, स्फोटक पदार्थाचा वापर करताना हयगय केल्याने हा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.