Sangavi News : महेश मंडळातर्फे आयोजित शिबिरात 122 जणांचे रक्तदान

0

एमपीसी न्यूज- सांगवी परिसर महेश मंडळातर्फे कै. तुकाबाई जगन्नाथ लोहिया यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. 122 जणांनी रक्तदान केले.

राज्यातील रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करीत पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये हे शिबिर पार पडले.  नगरसेविका शारदा सोनवणे, सतीश लोहिया, मनोज अटल, कुलदीप बजाज, गजानंद बिहाणी आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात 122 रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र  कार्य  केले.

_MPC_DIR_MPU_II

रक्तसंकलनसाठी पुणे सेरॉलॉजिकल रक्तपेढ़ीने सहकार्य केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन सतीश लोहिया यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल, दीपेश मालानी, गणेश चरखा, तुषार चांडक, विवेक झंवर यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment