Exam application : दहावी बारावीच्या परिक्षांचे अर्ज भरण्यास शिक्षण मंडळातर्फे मुदत वाढ

एमपीसी न्यूज  दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या परिक्षांच्या अर्ज भरणाच्या मुदतीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (Exam application) शिक्षण मंडळातर्फे वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना 25 नोव्हेंबर पर्यंत त्यांचे अर्ज भरता येणार आहेत.

फेब्रुवारी-मार्च 2023 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरायची आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 5 नोव्हेंबरला, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून भरायची मुदत 10 नोव्हेंबरला संपत आहे.

PCMC News : स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत  लघुफिल्म, गीत, चित्रकला, शिल्प चित्र आणि पथनाट्य स्पर्धा

या मुदतीत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. दहावीची परीक्षा देणाऱ्या पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी,(Exam application) तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआय द्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 

दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याचा तपशील –

कालावधी-  माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी : 25 नोव्हेंबरपर्यंत तर पुनर्परीक्षार्थी/खासगी विद्यार्थी/श्रेणी सुधार योजना, तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे/ आयटीआयचे विद्यार्थी : 11 ते 25 नोव्हेंबरपर्यंत

– माध्यमिक शाळांनी चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरण्याची मुदत : 29 नोव्हेंबर पर्यंत

 

बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा तपशील –

कालावधी- उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रमाचे, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय द्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी : 15 नोव्हेंबरपर्यंत (नियमित शुल्कासह) आणि 16 ते 30 नोव्हेंबर (विलंब शुल्कासह)

– उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरण्याची मुदत : 2 डिसेंबर पर्यंत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.