Breaking News Corona : राज्यात सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती?

एमपीसी न्यूज – देशासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार पुन्हा एकदी अलर्ट झाले आहे. देशात गेल्या २४ तासात तीन हजार ९६२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय राज्यातील रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक केला आहे.

 

 

याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात,सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अन्य काही आदेश दिले आहेत.

 

रेल्वे, बस, सिनेमागृह,कार्यालये,रुग्णालये,महाविद्यालये, शाळा या ठिकाणी मास्क सक्तीचा असल्याच या पत्रात नमूद करण्यात आले आहे.त्याशिवाय राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकारी यांना कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढवा असेसुध्दा आदेश दिले आहेत.

 

सध्या नव्या व्हायरसची संख्या वाढत आहे त्यामुळे राज्य शासनाने नव्याने निर्बंध लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.यामध्ये सार्वजनिक आणि बंद जागांचा समावेश आहे.

 

दरम्यान देशात कोरोनाच वाढत प्रमाण पाहता केंद्र सरकारसुध्दा सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी पाच राज्यांना पत्र लिहिल आहे. यात तामिळनाडू, केरळ,तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे.

 

राज्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील रुग्णवाढ ही चिंताजनक असल्याचे केंद्राने म्हंटले आहे.या जिल्ह्यात टेस्टींग आणि लसीकरण वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.