Chakan News : चाकण शिक्रापूर रोडवर टेम्पो कंटेनरची समोरासमोर धडक, टेम्पो चालक ठार

एमपीसी न्यूज – चाकण शिक्रापूर रोडवर टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यामध्ये टेम्पो चालक ठार झाला आहे. बहुळ गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि.15)  हा अपघात झाला.

नितीन दत्तात्रय पिंगळे (वय 47) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

सागर नितीन सोनवणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, एमएच 46 एआर 1767 या कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नितीन पिंगळे हे त्यांच्या टेम्पोमधून (एमएच 14 जीडी 5612) शिक्रापूरकडे जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या एमएच 46 एआर 1767 या कंटेनरची आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या नितीन पिंगळे यांचा मृत्यू झाला. तसेच, दुसरा इसम जखमी झाला. असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.