Chakan : दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूने पायी चालत जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोरात धडक दिली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री पावणे नऊच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवर रासे गावाजवळ घडली.

शिवाजी खंडू मुंगसे (वय 68 रा. रासे, ता. खेड) असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा किरण शिवाजी मुंगसे (वय 35) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एम एच 14 / एफ एफ 6367 या दुचाकीस्वार विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिवाजी मुंगसे हे सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास चाकण शिक्रापूर रस्त्यावरून पायी चालत जात होते. रासे गावाजवळ एम एच 14 / एफ एफ 6337 या दुचाकीस्वाराने भरधाव वेगात दुचाकी चालवून शिवाजी यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये शिवाजी हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती न देता दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.