Chakan News: पार्क केलेली कार काढण्यास सांगितली म्हणून दुकानदाराला मारहाण   

एमपीसी न्यूज : दुकानासमोर पार्क केलेली गाडी काढण्यास सांगितली म्हणून चौघांनी दुकानदाराला मारहाण केली आहे.(Chakan News) ही घटना बुधवारी (दि.31 ऑगस्ट) सकाळी 9 वाजता चाकण येथील वाघे वस्ती येथे झाली.

या प्रकरणी रमेश गणपती पुरोहित (वय 48 रा.आंबेठाण, चाकण) यांनी फिर्याद दिली असून प्रदिप सोमनाथ उटे (रा. नाशिक), गहिनीनाथ नारायण उटे (वय 71 वर्ष रा. चाकण),गौतम गहिणीनाथ उटे ( वय 26 रा.चाकण), हर्षल रामनाथ उटे (वय 26 रा. चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रदिप,गहिणीनाथ व गौतम यांना पोलिसांनी अटक केली आहे.

MPC News Podcast 1 September 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पुरोहित केटर्सस नावाचे दुकान असून आरोपी प्रदीप याने फिर्यादी यांच्या दुकाना समोर कार लावली. त्याला कार काढण्यासाठी फिर्यादी यांनी सांगितले, त्याचा राग आल्याने दुकानात घुसून हाताने मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.(Chakan News) तर गोतम याने फिर्यादीच्या मानेवर लाकडी दांडक्याने व पाण्याच्या जारने मारहाण केली व दुकानात तोडफोड करत दहा हजार रुपयांचे नुकसान केले. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.