Chaturshringi Temple : चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई

एमपीसी न्यूज : श्री देवी चतुःशृंगी मंदिरात आज सकाळी 9 वाजता नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली.  (Chaturshringi Temple) सकाळी देवीला या वर्षीचे मंदिर व्यवस्थापक नंदकुमार अनगळ यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात आले. नारायणराव कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. आज पहाटेपासून दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

Pune crime : म्हशीने घरासमोर घाण केल्याने, दोन कुटुंबीयात फ्री स्टाइल हाणामारी

उत्सव काळात मंदिर भाविकांसाठी 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. दररोज सकाळी 10 व रात्री 9 वाजता महाआरती करण्यात येणार आहे. (Chaturshringi Temple) तसेच गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण करण्यात येईल. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.  नवरात्री उत्सवाच्या निम्मिताने मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.