Chaturshrungi Police : मयत पतीला जिवंत दाखवून पेन्शन घेणाऱ्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पती मयत असतानाही जिवंत असल्याचे प्रमाणपत्र देऊन पेन्शन घेणाऱ्या पत्नी विरोधात पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तब्बल दीड वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आला. राजे पद्मनाभन असे गुन्हा दाखल झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी रिझर्व बँक ऑफ इंडिया कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बँकिंगचे सहाय्यक महाव्यवस्थापक अंजली कार्यकर यांनी चतुर्श्रुंगी पोलीस (Chaturshrungi Crime) ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, के पी पद्मनाभन हे रिझर्व बँक ऑफ इंडिया येथे कर्मचारी होते. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना निवृत्ती वेतन मिळत होते. दरम्यान 14 जून 2018 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतरही त्यांच्या पत्नीने बँकेला ते जिवंत असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे बँकेकडून त्यांना पेन्शन दिली जात होती. 21 डिसेंबर 2020 रोजी राजे पद्मनाभन यांचेही निधन झाले. त्यानंतरही पेन्शन जानेवारी 2021 पर्यंत सुरूच होती.

Girish Bapat : भाजप नेते गिरीश बापट सगळ्याच पक्षांवर नाराज, वाचा काय म्हणाले?

दरम्यान आता हा प्रकार उघडकीस (Chaturshrungi Crime) आला आहे. या पेन्शनचा लाभ नक्की कोण घेत होते? फसवणूक नेमकी कोणी केली याचा तपास आता चतुर्श्रुंगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.