Girish Bapat : भाजप नेते गिरीश बापट सगळ्याच पक्षांवर नाराज, वाचा काय म्हणाले?

एमपीसी न्यूज : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट (Girish Bapat) सगळ्याच पक्षावर नाराज आहे. हो त्यांनीच हे बोलून दाखवलं. राजकीय जीवनात आपण सामाजिक शैक्षणिक काम करत असतो. मात्र समाजाच्या शेवटपर्यंत जाणे आणि प्रश्न सोडवणे हे राज्यकर्त्याचं काम आहे. परंतु, आता तसं होताना दिसत नाही. कार्यकर्त्यांमधील कार्य मेले अन् फक्त पुढारीच राहिला हे योग्य नाही. मतांच्या राजकारणासाठी काहीही करत राहिलो तर ते चुकीचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

गिरीश बापट म्हणाले, कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करत राहावं. त्यांच्या कामाची पक्ष दखल घेतच असतो. प्रत्येकालाच नगरसेवक आमदार मंत्री खासदार होता येणं शक्य नाही. कारण जागा मर्यादित आहेत. लोकांचं काम करण्यात खरा आनंद असतो. एखाद्याचं काम आपण केलं तर त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येत त्यात मला आनंद वाटतो. परंतु, नव्या राजकीय संस्कृतीत काम सोडून बाकी सगळे सुरू आहे. भाजपसह सर्वच पक्षात हे सुरू असल्याचे सांगत त्यांनी हे मला पटत नसल्याचे परखड मत व्यक्त केलं.

Pune Railway Police : रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाश्याचे प्राण

गिरीश बापट (Girish Bapat) म्हणाले, मागील पन्नास वर्षापासून मी राजकारणात आहे. शहरात एक त्रिकोण, एक चौकोन असा दाखवा, जिथे मी माझ्या आई बापाचं नाव दिलं. नाव लावण्याची ही कुठली प्रथा. सातबारा आपल्या नावावर आहे का? लोकांनी काम करण्यासाठी आपल्याला निवडून दिलं आहे. अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करण्याचं काम मी केलं आहे. आज-काल उद्घाटन भूमिपूजन करतात आणि फोटो सोशल मीडियावर टाकतात हे खरे काम नाही असे देखील गिरीश बापट म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.