Pune Railway Police : रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाश्याचे प्राण

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका यात्रेकरूचे प्राण वाचले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या (Pune Railway Police) जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

आज शनिवारी सकाळी पुणे रेल्वे स्टेशनहुन मुंबईला जाणाऱ्या हुसैन सागर एक्सप्रेसच्या डब्यातून उतरताना एका प्रवाश्याचा पाय घसरून तो एक्सप्रेस ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मधील जागेत पडणार होता. पण, तेवढ्यात प्लॅटफॉर्मवरील रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एस. के. शर्मा, प्रफुल खर्चे आणि शिपाई आर. के. सोनकर यांनी त्या प्रवाश्याला ट्रॅकवर खाली पडण्याच्या अगोदरच बाहेर खेचले व प्लॅटफॉर्मवर आणले. त्यामुळे त्या प्रवाश्याचे प्राण वाचले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसैन सागर एक्सप्रेसने प्रवास करणारे या प्रवाश्याला पुणे रेल्वे स्टेशनला उतरायचे होते. पण, तो झोपला होता. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघाल्यानंतर या प्रवाश्याला जाग आली. आणि तो प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरून तो पडला. सुदैवाने तो ट्रॅकवर पडण्यापूर्वीच रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला ओढले व त्याचे प्राण वाचवले.

Pimpri Artificial Pond : नदी प्रदूषण रोखण्यासाठी श्रींच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात करा : विजय आसवानी

रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या या उत्कृष्ट (Pune Railway Police) कामगिरीबद्दल प्रवाश्यांसहित पुणे डिव्हिजनल रेल मॅनेजर रेणू शर्मा, ॲडिशनल डिव्हिजन मॅनेजर ब्रजेश कुमार सिंह सहित इतर रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रेल्वेने प्रवाश्यांना आवाहन केले आहे, की चालत्या गाडीमध्ये चढू नये किंवा चालत्या गाडीतून उतरू नये कारण यामुळे संबंधित व्यक्तीला दुखापत होऊ शकते किंवा त्यांचा प्राणही जाऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.