Chikhali : संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 27 वाहने चिखली पोलिसांकडून जप्त

एमपीसी न्यूज – संचारबंदीचे उल्लंघन करीत विनाकारण रस्त्यावर फिरणारी 27 वाहने चिखली पोलिसांनी जप्त केली. त्यामध्ये सहा कार, दोन रिक्षा आणि 19 दुचाकींचा समावेश आहे.

संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर घुटमळणे, वाहने घेऊन फेरफटका मारणे गुन्हा आहे. संचारबंदीच्या काळात सर्वकाही बंद असते, अनेकांना बंद शहर बघण्याची मोठी हौस असते. तसेच काही जणांना विनाकारण घराबाहेर फिरण्याची सवय असते. मात्र, ही सवय त्यांच्या चांगलीच अंगलट येत आहे.

वाकड पोलिसांनी बुधवारी (दि. 1) तब्बल 50 वाहने जप्त करून वाहन धारकांवर कारवाई केली. त्यांनतर चिखली पोलिसांनी देखील 27 वाहने जप्त केली असून त्यामध्ये सहा कार, दोन रिक्षा आणि 19 दुचाकींचा समावेश आहे. संबंधित वाहन चालकांवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.