Chikhali : सोन्याचे दुकान टाकण्याच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियातून मैत्री वाढवून त्याआधारे पुण्यामध्ये सोन्याचे दुकान सुरु करू. त्या दुकानाचा कारभार सगळा तुम्ही बघायचा. असे अमिश दाखवून दोन आरोपींनी वृद्धाची सात लाखांची फसवणूक केली.

बाजीराव लक्ष्मण खांडेकर (वय 54, रा. श्रीनाथजी हाईट्स, पूर्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लुईस क्रिस्तोफर व सोनिया (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लुईस आणि सोनिया यांनी फेसबुक आणि व्हाट्सअपवर मैत्री केली. ही मैत्री वाढून आरोपींनी बाजीराव यांना पुण्यात सोन्याचे दुकान टाकून त्या दुकानाचे व्यवस्थापन त्यांनी बघायचे, असे अमिश दाखवले. त्यासाठी कस्टम ऑफिसर लुईस दिल्ली येथे आली आहे. कस्टमच्या डॉक्युमेंटेशनसाठी 4 लाख 54 हजार 755 रुपये, कस्टम क्लिअरन्ससाठी 1 लाख 81 हजार 902 रुपये, फायनान्स मिनिस्ट्री क्लिअरन्ससाठी असे मिळून एकूण 7 लाख 1 हजार 657 रुपये देण्यास आरोपींनी भाग पाडले. बाजीराव यांनी वेगवेगळ्या खात्यावरून आरोपींच्या खात्यावर पैसे पाठवले. परंतु आरोपींनी पैसे मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही. यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाजीराव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.