Chikhali : ‘माहेरी जा, नाहीतर तुला उद्याचा दिवस दिसणार नाही’ अशी धमकी देत छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरातील काम येत नसल्याच्या कारणावरून ‘तू तुझ्या आई-वडिलांकडे निघून जा. जर गेली नाहीस तर तुला उद्याचा दिवस दिसणार नाही’ अशी धमकी देत विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती कौशल सुभेदार जैसवाल, सासू विमला सुभेदार जैसवाल, सासरे सुभेदार महादेव जैसवाल, दीर राहुल सुभेदार जैसवाल, नणंद काजल सुभेदार जैसवाल (सर्व रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 17 मे 2019 ते 4 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घडला. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी महिलेला घरातील कामे करत नसल्याच्या कारणावरून ‘तू तुझ्या आई-वडिलांकडे निघून जा. जर गेली नाहीस तर तुला उद्याचा दिवस दिसणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच घर आणि बुलेट गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.