Chikhali Crime News : चिखलीत फळ विक्रेत्यांची पोलिसांना मारहाण, दोघेजण अटक 

एमपीसी न्यूज – संचारबंदी कलम अंतर्गत राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सुरू ठेवलेल्या आस्थापनावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना फळ विक्रेत्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. चिखलीत शुक्रवारी (दि.16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

मोहम्मद इरफान अब्दुल हन्नान बागवान (वय 24, रा. राजवाडा चिखली) व मोहम्मद इम्रान अब्दुल रहमान शेख (वय 22, रा. राजवाडा चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, दोन विधी संघर्षित बालक आहेत.  याप्रकरणी पोलीस नाईक दिपक मोहिते यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
_MPC_DIR_MPU_II
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुधवारी (दि.14) रात्री आठपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत सायंकाळी सहा नंतर अत्यावश्यक वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता अटक आरोपी फळ विक्रेत्यांनी पोलिसांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.