Chikhali : कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना पकडण्यात आले यश

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी टोळी चिखली पोलिसांनी जेरबंद केली. चिखली मधील प्रवीण इंडस्ट्रीज या कंपनीतून चोरून नेलेला माल आणि चोरीसाठी वापरलेल्या टेम्पोसह पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

आलम युनुस मणियार (वय 33, रा. पुनावळे. मूळ रा. उत्तर प्रदेश), जुबेर अब्दुलवहाब मेमन (वय 27, रा. पुनावळे. मूळ रा. आंध्र प्रदेश), दीपक कपिलदेव तिवारी (वय 22, रा. पुनावळे. मूळ रा. उत्तर प्रदेश) `अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नगर चिखली मधील प्रवीण इंडस्ट्रीज या कंपनीतून अज्ञातांनी एक लाख 75 हजार रुपये किमतीचे पार्टस् चोरून नेले. ही घटना 5 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी प्रवीण भुजबळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या गुन्ह्याचा तपास करत असताना चिखली पोलिसांनी प्रवीण इंडस्ट्रीज (chikhali) परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक अनोळखी टेम्पो मधून काहीजण आले. त्यांनी कंपनीतील पार्टस् चोरून नेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी टेम्पोच्या क्रमांकावरून टेम्पो मालकाला संपर्क केला. मात्र तो टेम्पो एक वर्षापूर्वी रामविलास यादव यांना विकला असल्याचे समजले. यादव यांच्याशी संपर्क केला असता संबंधित टेम्पो त्यांनी अफझल युनुस मणियार याला दिला असल्याचे सांगितले.

Alandi : बसमधून महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

 

त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आलम जुबेर आणि दीपक या तिघांना अटक केली. त्यांचे साथीदार अफझल आणि छोटू शामलाल यादव यांचा (Chikhali) पोलीस शोध घेत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त संदीप हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस अंमलदार बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, भास्कर तरळकर, दीपक मोहिते, संदिप मासाळ, अमर कांबळे, गौतम सातपुते, कबीर पिंजारी, संदीप राठोड, संतोष सपकाळ, संतोष भोर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.