Chikhali News: दवाखान्याचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – नवीन सुसज्ज चिखली येथील दवाखान्यामुळे घरकुल  मधील तसेच आजूबाजूच्या नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी उत्तम सोय उपलब्ध होईल असे महापौर उषा ढोरे म्हणाल्या.

चिखली येथे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसदस्य एकनाथ पवार,   नगरसदस्या अश्विनी बोबडे, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, माजी नगरसदस्य भीमा बोबडे, संजय नेवाळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, डॉ.बाळासाहेब होडगर,  प्रफुल्ल पुराणिक  आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुथान अभियान अंतर्गत चिखली येथील सेक्टर क्र. 17 व 19 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प कार्यान्वीत आहे. या परिसरात 139 इमारतीमध्ये अंदाजे 30 हजार नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांच्या प्राथमिक उपचारासाठी तेथे दवाखान्याची स्थानिक नागरिकांची मागणी होती. त्यानुसार आज दवाखान्याचे लोकार्पण करताना अतिशय समाधान होत असल्याचे महापौर  ढोरे म्हणाल्या .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.