Chikhali News: जाताजाता पदाधिका-यांनी केली जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी

एमपीसी न्यूज – नगरसेवकांसह पदाधिका-यांचा कार्यकाळ उद्या रविवारी संपण्यापूर्वी महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेत्यांनी आज (शनिवारी) चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्र प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी चिखली येथील 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्राचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करुन दोन महिन्यात नागरिकांना दररोज शुध्द व पुरेसा पाणीपुरवठा होईल असा दावा केला.

महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांच्यासह सहशहर अभियंता श्रीकांत सवने, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 12 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोकसंख्या वाढीचा दर आणि शहराच्या विकासाच्या वाढीचा वेग लक्षात घेऊन पिंपरी- चिंचवड महापालिकेने आंद्रा व भामा आसखेड धरणातून 97.661 दशलक्ष घन मीटर पाणी कोटाची शासनाकडून मान्यता घेतली आहे. या योजने अंतर्गत जलशुध्दीकरण केंद्रे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. यामधील एअरेशन फाउंटेन, क्लॅरीफ्लोक्युलेटर, फिल्टर हाऊस, शुध्द पाण्याची संपवेल इत्यादी मुख्य कामे पूर्ण झाली असून दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. शहरातील नागरिकांना पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर ढोरे यांनी  दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.