Chinchwad Bye-Election : भाजपच्या पराभवाची सुरुवात पोटनिवडणुकीतून होईल – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज – विरोधी बोलणार्‍या प्रत्येकाला कारागृहात डांबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातो. भाजपचा पराभव करणे ही काळाची गरज बनली आहे. (Chinchwad Bye-Election) त्याची सुरवात चिंचवडमधील पोटनिवडणुकीने होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पुनावळे येथील आयोजित जाहीर सभेत भुजबळ बोलत होते.

माजी मंत्री धनंजय मुंडे, उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आमदार अमोल मिटकरी, आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,  माजी आमदार प्रकाश गजभीये, रविकांत वर्पे, महेश शिंदे, ईश्वर बाळबुधे, देवदत्त निकम, सलील देशमुख, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, सतिश दरेकर, वैशाली घोडेकर, समीर मासूळकर, शीतल हागवणे, संगिता ताम्हाणे, रेखा दर्शिले संदीप पवार, विजय दर्शिले, संजय अवसरमल, संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, वर्षा जगताप, विजय लोखंडे, देवेंद्र तायडे, संगिता कोकणे, किरण देशमुख, कविता खराडे, युवराज पवार, अजित पोपट पवार, सागर ओव्हाळ, तुषार ताम्हाणे, पी. के. महाजन, अभिजित आल्हाट उपस्थित होते.

Pimpri News : लग्नाचे तसेच कमी किंमतीत गाड्या देण्याचे आमिष दाखवून महिलेची साडे सात लाखांची फसवणूक

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, सीबीआय आणि ईडीसारख्या यंत्रणांचा गैरवापर या सत्ताधार्‍यांनी केला आहेच. पण, आता निवडणूक आयोग आणि न्यायसंस्थांवरही दबाव आणून (Chinchwad Bye-Election) अख्खा पक्ष एका गटाच्या झोळीत घालण्याचे पाप या सरकारने केले आहे. आम्हीही शिवसेना सोडली. राज ठाकरे यांनी सोडली. नारायण राणेंनी सोडली. पण शिवसेना संपवावी, अशी भावना कोणीही व्यक्त केली नाही.

एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून, ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देऊन शिवसेना संपवण्याचा कट भारतीय जनता पक्षाने आखला आणि निवडणूक आयोगातील आपल्या हस्तकांमार्फत तो अंमलात आणण्याचे प्रयत्न केले, असा आरोपही भुजबळ यांनी केला. संजय राऊत हे भाजपच्या गैरकारभाराचे वाभाडे काढत होते. त्यांना तुरूंगात डांबले. नवाब मलिक विरोधात बोलत, त्यांना खोट्या केसेसमध्ये गुंतवले. अनिल देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकवले. मला जामीनावर बाहेर आहात, अशा धमक्या दिल्या जातात, असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही हा भाग वेगळा. पण, असली दडपशाही या देशाने आणीबाणीतही अनुभवली नसल्याची टीका भुजबळ यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.