Pimpri News : लग्नाचे तसेच कमी किंमतीत गाड्या देण्याचे आमिष दाखवून महिलेची साडे सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  लग्नाचे आमिष दाखवून तसेच कमी किंमतीत गाड्या देतो म्हणत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिची साडे सात लाखांची फसवणूक केली आहे. (Pimpri News) हा प्रकार पिंपरी येथे 16 सप्टेंबर 2022 ते 27 नोव्हेंबर 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून रुपेश शालीग्राम धुरई (वय 38 रा. नागपूर) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad News : महिलेचे सव्वा लाखाचे गंठण हिसकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी आरोपीने ओळख वाढवली तसेच तो इंडियन ऑईल अँड नॅचरल गॅस येथे जॉबला असल्याचे भासवले. (Pimpri News) पीडितेचा विश्वास संपादन करत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच फिर्यादीच्या ओळखीचे अभिजीत मदने यांनी कमी किंमतीत गाडी देतो म्हणत साडे सात लाख रुपयांची फसवणूक केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.