Chinchwad : शहर पोलिसांकडून गुन्हेगारांची झाडाझडती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Chinchwad) रविवारी (दि. 16) रात्री अकरा ते सोमवारी (दि. 17) पहाटे चार वाजताच्या कालावधीत ऑल आउट ऑपरेशन कोंबिंग आणि नाकाबंदी केली. यामध्ये पोलिसांनी तडीपार, फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींची झाडाझडती घेतली.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार केलेल्या कारवाईमध्ये 113 पोलीस अधिकारी, 496 पोल्स अंमलदार सहभागी झाले. पोलिसांनी 536 रेकॉर्डवरील आरोपी चेक केले. 12 कोयते, 2 सुरे अशी 14 हत्यारे जप्त केली. तडीपार केलेले सहा आरोपी शहर हद्दीत आढळल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

चार किलो 100 ग्राम गांजा जप्त करत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. 122 हिस्ट्रीशीटर चेक केले. 45 आरोपींना अटक केली. चौघांना एनबीडब्ल्यू आणि पाच जणांना बीडब्ल्यू वॉरंट बजावण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सात कारवाया करण्यात आल्या.

PMPML : पीएमपीएमएलच्या पास योजनेला दिव्यांगांसाठी मुदतवाढ; ऑनलाईन पद्धतीने अर्जाचे आवाहन

पाच तासांच्या कालावधीत दोन हजार 964 संशयित वाहने चेक (Chinchwad) करून 144 वाहनांवर कारवाई करण्यात आली. 126 लॉज, हॉटेल तसेच 122 संशयित व्यक्तींना तपासण्यात आले. 66 संशयित वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सहा कारवाया करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.