Chinchwad News : एक्साईड इंडस्ट्रीज कंपनी विरोधात कामगारांचे पिंपरीत ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज – कामगारांनी बाहेरील कामगार संघटनेचे सदस्यत्व (Chinchwad News ) स्वीकारले म्हणून चिंचवड येथील एक्साईड इंडस्ट्रीज कंपनी कामगाराचे शोषण करत असून अंतर्गत युनीयनसाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करत गुरुवारी (दि.23) कंपनीच्या कामगारांनी तसेच महाराष्ट्र राज्य  राष्ट्रीय कामगार संघटनेने पिंपरीतील आंबेडकर चौकात एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले.

 

यावेळी संघटनेचे प्रदेश सचिव ईश्वर वाघ, युनियन कमिटीचे सदस्य दिलीप भोंडवे, सुनिल राजगुरु, आत्माराम धुमाळ, सुनिल परसे, भाऊसाहेब कदम, रवींद्र खराडे, निखील शेटे, गोकुळ झुरुंगे, संतोष तापकीर व कामगार उपस्थीत होते.

 

Hinjawadi Crime News : कंपनीत घुसून महिलेला शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा

 

 

यावेळी महाराष्ट्र  राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एक्साईड इंडस्ट्रीज कंपनीच्या युनीयन कडून कामगारांकडे दुर्लक्ष होत असल्याने कंपनीच्या कामगारांनी माजी उद्योगमंत्री व विद्यमान आमादार सचिन आहिर यांच्या महाराष्ट्र  राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे कामगारांनी सदस्यत्व स्वीकारले.याचा राग धरून कंपनीने 20 कामागारांना निलंबीत केले तर दहा कामगारांना हरियाणा येथे बदली केली. तर काही कामगारांना अत्यंत कमी मोबादल्यात ऐच्छीक निवृत्ती घेण्यास भाग पाडले जात आहे.

 

कंपनीकडे चर्चेची मागणी कामगारांनी केली असता कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही. याआधीही कामगारांनी निषेध तसेच उपोषण केले आहे मात्र कंपनीने त्यालाही कोणतीच दाद दिली नाही. उलट कामगारांसाठी 165 दिवस कंपनीची कॅन्टीन सुविधा बंद कऱण्यात आली. या साऱ्या अन्याया विरोधात व कामगारांच्या शोषणा विरोधात हे एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात (Chinchwad News ) आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.