Chinchwad : तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी विनापरवाना शहरात (Chinchwad)आला. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्टल देखील जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 9) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड येथे करण्यात आली.

सुनील मारुती लोणी (वय 22, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या (Chinchwad)आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार पंकज भदाणे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील लोणी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 24 एप्रिल 2023 रोजी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी अवघे काही दिवस शिल्लक असताना तो नागसेननगर झोपडपट्टी येथे रेल्वे पटरीजवळ चिंचवड येथे आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Pimpri : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने 14 लाखांची फसवणूक

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 42 हजार रुपये किंमतीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी सुनील याला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.