Chinchwad crime News : सिगारेटचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला शिवीगाळ, टपरीची तोडफोड

एमपीसी न्यूज – टपरी चालकाने सिगारेटचे पैसे मगितल्याच्या रागातून ग्राहकाने टपरी चालकाला शिवीगाळ करत टपरीतील सामानाची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी पाच वाजता चिंचवड गावात घडली.

प्रतिक उर्फ सोन्या उत्तम जगताप (वय 24, रा. भीमनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दीपक रामप्यारे जैसवाल (वय 25, रा. बोपोडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांची चिंचवड गावात पानटपरी आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आरोपी प्रतीक फिर्यादी यांच्या टपरीवर सिगारेट पिण्यासाठी आला. सिगारेट घेतल्यानंतर दीपक यांनी प्रतीककडे सिगारेटचे पैसे मागितले.

त्यावरून प्रतिकने शिवीगाळ करत चाकू दाखवून दीपक यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दीपक यांच्या टपरीमधील सामानाची नासधूस करून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.