Chinchwad : किरकोळ कारणावरून तीन भावंडांकडून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – तीन भावंडांनी मिळून एका तरुणाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. तसेच तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी साडे पाचच्या सुमारास विद्यानगर चिंचवड येथे घडली.

सचिन ज्ञानदेव वाघमारे (वय 31, रा. विद्यानगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नेहा छोटू भोसले, शर्कू उर्फ सुरज छोटू भोसले (वय 28), गेट्रो उर्फ किरण छोटू भोसले (वय 25) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांच्या घरासमोरील भिंतीला एक लाकडी प्लायवूड उभा केला होता. आरोपी नेहा हिने तो प्लायवूड ढकलून दिला. यावर सचिन यांनी तिला जाब विचारला. त्यावरून नेहा हिने सचिन यांना शिवीगाळ केली. त्यानंतर नेहा हिचे दोन भाऊ तिथे आले. त्यांनी देखील सचिन यांना शिवीगाळ केली.

आरोपी सुरज याने सचिन यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यामध्ये सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर आरोपी किरण याने प्लॅस्टिकची बादली सचिन यांच्या पायावर मारली. त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘आमच्या नादाला लागला तर जिवे मारून टाकू’ अशी धमकी दिली. आरोपी नेहा हिने सचिन यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.