Choreographer Saroj Khan Passes Away: प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं मुंबईत निधन

Choreographer Saroj Khan passes away at the age of 71, in Mumbai आपल्या कारकीर्दीत 2000 हून अधिक गाण्यांवर त्यांनी नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या सरोज खान यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

एमपीसी न्यूज- प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका (कोरिओग्राफर) सरोज खान यांचं शुक्रवारी रात्री उशिरा हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. सरोज खान यांच्यावर 17 जूनपासून वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिथे दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 1.52 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील चारकोप कब्रस्तानमध्ये अंतिम संस्कार होणार आहेत.

सरोज खान या मुधमेह आणि त्यासंबंधित विविध आजारांनी ग्रस्त होत्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

त्यांनी अनेक वर्षे आपल्या कामातून ब्रेक घेतला होता. परंतु, मागील वर्षी (2019) त्यांनी पुनरागमन करत मल्टिस्टारर सिनेमा कलंक आणि कंगना रनौतचा सिनेमा ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ यातील एक-एक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले होते.


वयाच्या अवघ्या तिसऱ्यावर्षी त्यांनी सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्यांना 1974 मध्ये पहिल्यांदा गीता मेरा नाम या सिनेमातून नृत्यदिग्दर्शिका म्हणून ब्रेक मिळाला होता.

आपल्या कारकीर्दीत 2000 हून अधिक गाण्यांवर त्यांनी नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या सरोज खान यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी काही सिनेमांसाठी लेखिका म्हणूनही काम केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.