Tokyo Olympic 2020 : चक दे इंडिया ! भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश 

एमपीसी न्यूज – रविवारी भारतीय पुरूष हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला धुळ चारत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आता भारतीय महिला हॉकी संघाने देखील बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव केला आहे.  

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केली आहे. महिला संघाच्या चमकदार कामगिरीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता भारतीय महिला संघ देखील सूवर्ण पदकापासून दोन सामने दूर आहे.

खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं.

जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने 1-0 ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला.

दरम्यान, भारताने आत्तापर्यंत टोकीयो ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.