Chinchwad : मोबाईल हिसकावणा-या दोघांना नागरिकांनी पकडले

एमपीसी न्यूज – पादचारी नागरिकाचा मोबाईल फोन हिसकावणा-या दोन चोरट्यांना नागरिकांनी पाठलाग करून पकडले. ही घटना आज, मंगळवारी (दि. 10) सायंकाळी केएसबी चौकाजवळ चिंचवड येथे घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहाच्या सुमारास चिंचवडमधील केएसबी चौकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोरून एक व्यक्ती रस्त्याने पायी चालत जात होता. त्यावेळी मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा मोबाईल फोन हिसकावला. फोन हिसकावून पळून जात असताना पादचारी नागरिकाने एकाला पकडले.

एका चोरट्याला पकडल्याचे दिसताच दुसरा चोरटा पळून जाऊ लागला. त्यावेळी आसपासच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि दुस-या चोरट्याला देखील पकडले. चोरट्यांना पकडल्यानंतर चोरटे नागरिकांशी हुज्जत घालून अरेरावी करीत होते. नागरिकांनी दोन्ही चोरट्यांना पिंपरी पोलिसांच्या हवाली केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.