Dehuroad News : ‘आयुध निर्माणी’त आंदोलनाची धग, कामगारांची केद्र सरकार विरोधात निदर्शने

एमपीसी न्यूज – केंद्र सराकरने आयुध निर्माणी मंडळाचे (ऑर्डनन्स फॅक्टरी) व्यावसायिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात कामगार संघटना एकत्र आल्या असून आज (शनिवारी) सकाळी त्यांनी देहुरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरी बाहेर काळे झेंडे दाखवून आणि काळ्या फिती बांधून सरकार निर्णयाचा निषेध केला.

यावेळी ऑल इंडिया डिफेन्स एम्पलॉईज फेडरेशन (AIDEF) संघटनेचे निसार शेख, गौतम कदम, सिद्धार्थ गायकवाड, प्रसाद कातकडे, धिरज लोहार, इंडीयन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशनचे (INDWF) गजानन काऴे , केतन खऴदकर, रंजित पाटिल, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (BPMS) संघटनेचे दिलीप झा अशोक थोरात, रमेश रमन, विशाल उत्तम आणि ट्रेड युनियन कॉर्डीनेट कमिटी (TUCC) संघटनेचे मोहन घुले, प्रशांत कोकाटे, सलिम शेख, मिलिंद भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारने आयुध निर्माणी मंडळाचे व्यावसायिकरण करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला मान्यताप्राप्त संघटनानी जोरदार विरोध केला आहे. आजपासून कामगारांनी विरोध निदर्शनाला सुरूवात केली आहे. सकाळी साडे सातच्या दरम्यान कामगारांनी काळे झेंडे दाखवत सरकार केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच, दुपारी खाजगीकरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने आयुध कारखाने मंडळे बरखास्त करून त्याचे कंपनीत रूपांतर करण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे सध्या मंडळ या नात्याने कार्यरत असलेल्या देशातील 41 आयुध कारखाने सात कंपन्यांमध्ये विभागले जाणार आहेत. या निर्णयाला कर्मचा-यांनी तीव्र विरोध केला असून, विविध संघटनांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.