Chinhwad News : नृत्य कला मंदिरकचा ‘भारत मेरा रंग रंगीला’ कार्यक्रम म्हणजे अनेक बहारदार लोकनृत्याचा महोत्सव

नाट्य, सिने सृष्टीतील कलाकारांसोबत लोकनृत्यात रमले पिंपरी चिंचवडकर; नृत्य कलामंदिरच्या लोकनृत्य शिबिराचा समारोप

एमपीसी न्यूज – नृत्य कलामंदिर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘नृत्योत्सव 2022’चे आयोजन करण्यात आले. याचा समारोप नृत्य कलामंदिर संस्थेच्या संस्थापिका तेजश्री अडीगे यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या ‘भारत मेरा रंग रंगीला’ या बहारदार कार्यक्रमाने झाला. यात सिने, नाट्य सृष्टीतील अनेक कलाकारांनी विविध लोककला नृत्यांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमासाठी लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम, मुंबई येथील अनामय संस्थेच्या प्रमुख संगीता पेम, लायन्स क्लबचे आगामी प्रांतीय गव्हर्नर ला. राजेश कोठावडे, आगामी प्रांतीय गव्हर्नर 2 ला. सुनिल चेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कला क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या.

नृत्य कलामंदिर संस्थेच्या संस्थापिका तेजश्री अडीगे यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या भारताच्या लोककलेवर आधारित ‘भारत मेरा रंग रंगीला’ या कार्यक्रमात मयुरेश पेम आणि जुई सुहास यांनी होलीया मे उडे रे गुलाल या राजस्थानी नृत्यावर धमाल उडवली. अभिनेत्री अश्विनी मुकादम यांनी भारतीय लग्न संस्थेअंतर्गत स्त्री सुलभ भावनांचे दर्शन करणारा में तो भूल चली बाबुल का देस हे गरबा नृत्य सादर केले. तेजश्री अडीगे यांनी राजस्थानी घुमर आणि महाराष्ट्राची लोकपरंपरा दर्शवणारे लोकनृत्य मराठ्मोळ गाणं या गीतावर सादर केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून नृत्य कला मंदिर संस्थेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीतावर आधारित नृत्यरचना केली. जयोस्तुते श्री महनमंगले हे गीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि कुटुंबियांच्या आवाजातील या भारत वंदनेने भारत मेरा रंग रंगीला या कार्यक्रमाची सांगता झाली.

नृत्य कलामंदिरच्या 14 दिवसांच्या शिबिरात उत्कृष्ठ शिबिरार्थी म्हणून खालील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये 6 ते 10 वर्ष वयोगटात कनिष्का आचार्य, आर्या कुलकर्णी, आराध्या इनामदार, विधी खंडेलवाल, 10 ते 15 वर्ष वयोगटात कस्तुरी सुतार, एंजल पटेल, अंशीता बारगळ, महेश्वरी जोशी, 15 वर्षांवरील खुल्या वयोगटात वीणा भोसले, तन्वी एकवारी, पूर्वा जंगले, वेदश्री कोथमिरे या उत्कृष्ठ शिबिरार्थींचा लायन्स क्लब तळेगाव यांच्या वतीने मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनाली गोवंडे, वैभव घरत, सिद्धी कटारिया, कुमिदिनी पाटील, प्रशांत शिंदे, स्वाती तुळसकर, अनुष्का बैरागी यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.