Corona Vaccine Update : मेसेज आला तरच मिळणार कोरोनची लस : राजेश टोपे यांची माहिती

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केलं आहे. लस देण्यासाठी एक विशिष्ठ कार्यपद्धती आहे. त्यानुसार ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाणार आहे. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवून त्यानंतरच त्याला लस देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आपल्या देशात आणि राज्यात कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाची जोरदार पूर्व तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केलं आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जाते आहे असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. “18  हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचं मायक्रो प्लानिंग सुरु असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.