Pune News : पुण्यात कोरोना रुग्ण वाढले, अजित पवारांच्या आज होणाऱ्या बैठकीत नवे निर्बंध लागण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून सातत्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पुणे जिल्ह्यासाठी नवीन निर्बंध लागू केले होते. परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या घट झाली नाही.

मागील 24 तासात महाराष्ट्रात 43 हजार 211 रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दहा हजाराच्या वर गेली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत आणखी नव्याने निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे.

राज्यात सुरू झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबई आणि पुणे शहरात पुन्हा मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात तर ओमायक्रोन रुग्ण वाढीचा वेगही दुप्पट झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी आज आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि शासकीय पदाधिकारी उपस्थित असतील. रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी खडक करायची की नाही याबाबत या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.