Corona Vaccination News : लस उपलब्ध  नाही; शनिवारी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेच ‘या’ केंद्रांवर लसीकरण

एमपीसी न्यूज – शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या (शनिवारी) वय वर्षे 45 च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण होणार आहे. अँपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांनीच लसीकरणासाठी यावे असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

कोविड-19 आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनापैकी नागरिकांचे लसीरकण करणे हा महत्वाचा घटक आहे. लसीकरण वय गट 18 ते 44 करिता 8 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

नवीन भोसरी रुग्णालय पिन कोड- 411026, नवीन जिजामाता रुग्णालय-411017,  प्रेमलोक पार्क दवाखाना-411033, यमुनानगर रुग्णालय-411044, डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी- 411018, पिंपळे ‍निलख पी.सी.एम.सी स्कुल-411027, नवीन आकुर्डी रुग्णालय – 411035 आणि   आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी-411027 या रुग्णालयांमध्ये लसीकरण सेवा उपलब्ध आहे.

याकामी नागरीकांनी/लाभार्थ्यांनी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन Appointment घेणे बंधनकारक आहे. Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही.

तसेच शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या शनिवारी रोजी वय वर्षे 45 च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे 18 ते 44 वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी वरील आठही लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपस्थित रहावे, तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.