Corona News : चीनच्या आईस्क्रिममध्ये आढळला कोरोनाचा विषाणू

एमपीसी न्यूज: चीनमध्ये आईस्क्रिममध्ये कोरोनाचा विषाणूचा आढळून आला आहे. चीनच्या चायना डेली या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. तियानजिन भागांत ही घटना घडली असून स्थानिक आईस्क्रिम बनवणा-या कंपनीच्या आईस्क्रिममध्ये विषाणू आढळला आहे.

चीनच्या Tianjin Daqiaodao या स्थानिक कंपनीने आईस्क्रिमसाठी युक्रेनमधून दूध पावडर व व्हे मिस्ट न्यूझिलंडमधून घेतले आहे. यांमुळे शहरांतील आईस्क्रिम साठवण्याशी संबंधित शीत पदार्थ साठवणीची सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. या आईस्क्रिमच्या कंपनीने 4,836 बॉक्स आईस्क्रिम बनवले असून त्यांपैकी 1, 812 बॉक्सेस विविध प्रांतात विकले आहेत. 2,089 बॉक्स मात्र सिल केलेले आहेत.

स्थानिक बाजारपेठेत विकले गेलेल्या 65 बॉक्सेसची प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे. तसेच ज्या नागरिकांनी हे आईस्क्रिम विकत घेतले आहे, त्यांनी त्यांना जाणवत असलेले बदल लगेच कळवण्याचे आवाहनही केले आहे. जे लोकं या बॉक्सेसशी संपर्कात आले आहेत, अशा सर्वांचा शोध घेण्याचे तपासकाम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.