Corona World Update: 64 लाख रुग्ण कोरोनामुक्त, 44 लाख सक्रिय रुग्ण तर 5.33 कोरोनाबाधितांचा मृत्यू

Corona World Update: 64 lakh corona free, 44 lakh active patients and 5.33 lakh corona deaths कोरोनामुक्तांच्या प्रमाणात 56.54 टक्क्यांपर्यंत वाढ तर मृत्यूदर 4.69 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 38.77 टक्के खाली!

एमपीसी न्यूज – जगातील सुमारे 64.33 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता कोरोनामुक्तांचे प्रमाण 56.54 टक्के झाले आहे. जगातील  कोरोनामुक्तांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधित मृतांचे व सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे जगभरातील कोरोनाबाबत चिंतेचे वातावरण निवळण्यास मदत होणार आहे.  

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 13 लाख 78 हजार 979 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 33 हजार 384 (4.69 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 64 लाख 33 हजार 963 (56.54 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 44 लाख 11 हजार 632 (38.77 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 43 लाख 53 हजार 102 (98.67 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 58 हजार 530 (1.33 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

अमेरिकेत शनिवारी मृतांचा आकडा 254 पर्यंत खाली

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (शनिवारी) 45 हजार 182 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 29 लाख 35 हजार 770 झाली आहे. शनिवारी 254 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 32 हजार 318 वर जाऊन पोहचला आहे. हा गेल्या तीन महिन्यांतील सर्वांत कमी आकडा आहे. यापूर्वी 23 मार्चला 181 मृत्यूंची नोंद आहे. त्यानंतर 21 जूनला 271 तर 28 जूनला 285 कोरोना मृत्यू झाले होते. अमेरिकेत आतापर्यंत 12 लाख 60 लाख 405 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 15 लाख 43 हजार 047 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये शनिवारी 1,111 कोरोना बळी!

ब्राझीलमध्ये शनिवारी 1 हजार 111 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 64 हजार 365 वर जाऊन पोहचला आहे. त्याचवेळी शनिवारी 32 हजार 700 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ब्राझीलमध्ये एकूण 15 लाख 78 हजार 376 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 9 लाख 78 हजार 615 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 35 हजार 396 झाली आहे.

मेक्सिको शनिवारी 654 कोरोना बळी 

शनिवारी मेक्सिकोत 654 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. मेक्सिकोतील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 45 हजार 251 झाली असून त्यापैकी 1 लाख 47 हजार 205 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 29 हजार 843 कोरोना बळी गेले आहे. त्यामुळे आता मेक्सिकोत 68 हजार 203 सक्रिय रुग्ण उरले आहेत.

भारतात शनिवारी सर्वाधिक 610 कोरोना मृत्यूंची नोंद

भारतात शनिवारी 610 कोरोना बळींची नोंद झाली आहे. यात मागील काही दिवसांतील मृतांचाही समावेश आहे. या मृतांची नोंद काल करण्यात आली. पेरूमध्ये 186, रशियात 168, कोलंबियात 165, इराणमध्ये 148, चिलीत 141 तर इराकमध्ये 106 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. इजिप्तमध्ये 79, दक्षिण अफ्रिकेत 74, इक्वाडोरमध्ये 69, पाकिस्तानात 68, सौदी अरेबिया 56, इंडोनेशियात 53 तर बोलिवियात 49 बळी गेले आहेत.

पेरू पाचव्या, मेक्सिको नवव्या तर सौदी अरेबिया 13 व्या स्थानावर

सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत पेरू सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे स्पेन सहाव्या स्थानावर खाली आला आहे.  मेक्सिको 10 व्या स्थानावरून नवव्या स्थानावर तर सौदी अरेबिया 14 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर गेला आहे. आता इटली 10 व्या तर टर्की 14 व्या स्थानावर आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

27 जून – नवे रुग्ण 1 लाख 76 हजार 568, कोरोनामुक्त 1 लाख 01 हजार 108, मृतांची संख्या 4 हजार 547

28 जून – नवे रुग्ण 1 लाख 63 हजार 172, कोरोनामुक्त 95 हजार 410, मृतांची संख्या 3 हजार 454

29 जून – नवे रुग्ण 1 लाख 60 हजार 985, कोरोनामुक्त 1 लाख 09 हजार 374, मृतांची संख्या 3 हजार 415

30 जून – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 814, कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 375, मृतांची संख्या 5 हजार 062

1 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 96 हजार 901, कोरोनामुक्त 1 लाख 32 हजार 758, मृतांची संख्या 4 हजार 847

2 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 864, कोरोनामुक्त 2 लाख 278 , मृतांची संख्या 5 हजार 155

3 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 09 हजार 028, कोरोनामुक्त 1 लाख 34 हजार 276 , मृतांची संख्या 5 हजार 170

4 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 89 हजार 413, कोरोनामुक्त 1 लाख 41 हजार 408 , मृतांची संख्या 4 हजार 489

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 29,35,770 (+45,182), मृत 1,32,318 (+254)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 15,78,376 (+35,035), मृत 64,365 (+1,111)
  3. रशिया – कोरोनाबाधित 6,74,515 (+6,632), मृत 10,027 (+168)
  4. भारत – कोरोनाबाधित 6,73,904 (+24,015) , मृत 19,279 (+610)
  5. पेरू – कोरोनाबाधित 2,99,080 (+3,481), मृत 10,412 (+186)
  6. स्पेन –  कोरोनाबाधित 2,97,625 (+0), मृत 28,385 (+0)
  7. चिली – कोरोनाबाधित 2,91,847 (+3,758), मृत 6,192 (+141)
  8. यू. के. – कोरोनाबाधित 2,84,900 (+624), मृत 44,198 (+67)
  9. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,45,251 (+6,740), मृत 29,843 (+654)
  10. इटली – कोरोनाबाधित 2,41,419 (+235), मृत 34,854 (+21)
  11. इराण – कोरोनाबाधित 2,37,878 (+2,449), मृत 11,408 (+148)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,25,283 (+3,387), मृत 4,619 (+68)
  13. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,05,929 (+4,128), मृत 1,858 (+56)
  14. टर्की – कोरोनाबाधित 2,04,610 (+1,154) मृत 5,206 (+20)
  15. जर्मनी – कोरोनाबाधित 1,97,418 (+418), मृत 9,081 (+8)
  16. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 1,87,977 (+10,853), मृत 3,026 (+74)
  17. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,66,960 (+0), मृत 29,893 (+0)
  18. बांगलादेशकोरोनाबाधित 1,59,679 (+3,288), मृत 1,997 (+29)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,13,389 (+3,884), मृत 3,942 (+165)
  20. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,05,317 (+226), मृत 8,674 (+11)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.