Corona World Update: कोरोना बळींचा आकडा सहा लाखांच्या पुढे!

Corona World Update: Corona death toll rises to six lakh! कोरोनामुक्तांच्या प्रमाणात 59.71 टक्क्यांपर्यंत वाढ, मृत्यूदर 4.19 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 36.10 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – जगातील सुमारे एक कोटी 44 लाख कोरोनाबाधितांपैकी 86 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी 59.71 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोरोना बळींचा आकडा सहा लाखांच्या पुढे गेला असला तरी कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 4.19 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 36.10 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. काल (शनिवारी) जगभरात 2 लाख 24 हजार 065 नव्या रुग्णांची भर पडली त्याच वेळी 1 लाख 51 हजार 019 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 44 लाख 14 हजार 074 झाली असून आतापर्यंत एकूण 6 लाख 04 हजार 151 (4.19 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 86 लाख 06 हजार 611 (59.71 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 52 लाख 03 हजार 312 (36.10 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 51 लाख 43 हजार 402 (98.85 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 59 हजार 910 (1.15 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

12 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 94 हजार 677,  कोरोनामुक्त 1 लाख 02 हजार 610, मृतांची संख्या 3 हजार 956

13 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 95 हजार 878,  कोरोनामुक्त 1 लाख 13 हजार 919, मृतांची संख्या 3 हजार 731

14 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 16 हजार 806, कोरोनामुक्त 1 लाख 50 हजार 025, मृतांची संख्या 5 हजार 346

15 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 34 हजार 302, कोरोनामुक्त 1 लाख 89 हजार 633, मृतांची संख्या 5 हजार 755

16 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 48 हजार 914, कोरोनामुक्त 2 लाख 41 हजार 335, मृतांची संख्या 5 हजार 741

17 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 40 हजार 681, कोरोनामुक्त 1 लाख 76 हजार 369, मृतांची संख्या 5 हजार 583

18 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 24 हजार 065, कोरोनामुक्त 1 लाख 51 हजार 019, मृतांची संख्या 5 हजार 008

अमेरिकेत एकूण 1 लाख 42 हजार 877 कोरोना बळी

अमेरिकेत शनिवारी 63 हजार 259 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38 लाख 33 हजार 241 झाली आहे. शनिवारी अमेरिकेत 813 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 42 हजार 877 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 17 लाख 75 हजार 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 19 लाख 15 हजार 175 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमधील शनिवारी 885 कोरोनाबाधितांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये शनिवारी 803 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 78 हजार 817 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 75 हजार 246 झाली असून त्यापैकी 13 लाख 66 हजार 775 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 6 लाख 29 हजार 654 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 38,310 वर

मेक्सिकोत शनिवारी 736 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 38 हजार 310 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 3 लाख 31 हजार 298 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 2 लाख 08 हजार 436 रुग्ण बरे झाले असून 84 हजार 552 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात शनिवारी 543 कोरोना बळी

भारतात शनिवारी 543 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. कोलंबियात 228, पेरूमध्ये 199  इराणमध्ये 188, दक्षिण अफ्रिकेत 144, रशियात 124 तर फिलिपाइन्समध्ये 113 कोरोना बळी गेले. चिलीमध्ये 98, इराकमध्ये 75, बोलिवियात 65, इजिप्तमध्ये 63 तर इंडोनेशियात 59 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

दक्षिण अफ्रिकेतील वाढता संसर्ग चिंताजनक

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत सोमवारी 10 व्या स्थानावर असलेला दक्षिण अफ्रिका अवघ्या पाच दिवसांत पाचव्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. दक्षिण अफ्रिकेतील वाढता कोरोना संसर्ग हा चिंताजनक आहे. शनिवारी पेरूला मागे टाकत दक्षिण अफ्रिका पाचव्या क्रमांकावर गेला. मेक्सिकोने चिलीला मागे टाकत सातवे स्थान मिळवले. इटलीला मागे टाकत सौदी अरेबिया 13 व्या स्थानावर पोहचला तर फ्रान्सला मागे टाकत कोलंबियाने 18 वा क्रमांक मिळविला आहे. आता पेरू सहाव्या, चिली आठव्या, इटली 14 व्या तर फ्रान्स 19 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 38,33,271 (+63,259), मृत 142,877 (+813)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 20,75,246 (+26,549), मृत 78,817 (+885)
  3. भारत – कोरोनाबाधित 10,77,864 (+37,407) , मृत 26,828 (+543)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,65,437 (+6,234), मृत 12,247 (+124)
  5. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 3,50,879 (+13,285), मृत 4,948 (+144)
  6. पेरू – कोरोनाबाधित 3,49,500 (+3,963), मृत 12,998 (+199)
  7. मेक्सिको – कोरोनाबाधित 3,31,298 (+7,257), मृत 38,310 (+736)
  8. चिली – कोरोनाबाधित 3,28,846 (+2,307), मृत 8,445 (+98)
  9. स्पेन –  कोरोनाबाधित 3,07,335 (+0), मृत 28,420 (+0)
  10. इंग्लंड – कोरोनाबाधित 2,94,066 (+827), मृत 45,273 (+40)
  11. इराणकोरोनाबाधित 2,71,606 (+2,166), मृत 13,979 (+188)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,61,916 (+1,917), मृत 5,522 (+47)
  13. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,48,416 (+2,565), मृत 2,447 (+40)
  14. इटली – कोरोनाबाधित 2,44,216 (+249), मृत 35,042 (+14)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,18,717 (+918) मृत 5,475 (+17)
  16. जर्मनी – कोरोनाबाधित 2,02,572 (+227), मृत 9,162 (+2)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 2,02,066 (+2,709), मृत 2,581 (+34)
  18. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,90,700 (+8,560), मृत 6,516 (+228)
  19. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,74,674 (+0), मृत 30,152 (+0)
  20. अर्जेंटिना –  कोरोनाबाधित 1,22,524 (+3,223), मृत 2,220 (+42)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.