Corona World Update: सुमारे 57 लाख कोरोना रुग्णांपैकी उरले 29 लाख, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 51 टक्के!

Corona World Update: Out of 57 lakh corona patients, 29 lakh remain, 51% active patients! 24 लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

एमपीसी न्यूज – जगातील एकूण कोरोना संसर्ग 56 लाख 84 हजार 795 व्यक्तींपर्यंत वाढला असून कोरोना बळींच्या संख्येने साडेतीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मृत आणि बरे झालेले रुग्ण यांना वगळून आता जगात सुमारे 29 लाख कोरोना रुग्ण उरले आहेत. जगातील हे सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 51 टक्क्यांपर्यंत कमी आले आहे, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 56 लाख 84 हजार 795 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 52 हजार 225 (6.20 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 24 लाख 30 हजार 593 (42.76 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 29 लाख 01 हजार 977 (51.05 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 28 लाख 48 हजार 878 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 099 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

19 मे – नवे रुग्ण 94 हजार 813 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 589

20 मे – नवे रुग्ण 1 लाख 474 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 685

21 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 934

22 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 252

23 मे – नवे रुग्ण 99 हजार 938 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 183

24 मे – नवे रुग्ण 96 हजार 505 दिवसभरातील मृतांची संख्या 2 हजार 826

25 मे – नवे रुग्ण 89 हजार 756 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 096

26 मे – नवे रुग्ण 92 हजार 060 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 048

अमेरिकेत कोरोना बळींनी ओलांडला एक लाखाचाही टप्पा

अमेरिकेत मंगळवारी 774 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 572 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 17 लाख 25 हजार 275 झाली आहे तर 4 लाख 79 हजार 969 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

ब्राझीलमध्ये काल (मंगळवारी) 1,027, स्पेनमध्ये 280, मेक्सिको 239, रशियात 174 तर भारतात 172 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. पेरूमध्ये 159, इंग्लंड 134, फ्रान्स 98, स्वीडन 96, कॅनडा 94, इटली 78, जर्मनी 70 तर इराणमध्ये 57 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक क्रमवारीत चिलीत 15 व्या तर पाकिस्तान 18 व्या स्थानावर

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत चिलीने सौदी अरेबियाला मागे टाकत 15 वे स्थान मिळविले आहे तर पाकिस्तानने बेल्जियमला मागे टाकत 18 वे स्थान मिळविले. आता सौदी अरेबिया 16 व्या स्थानावर तर बेल्जियम 19 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 1,725,275 (+19,049), मृत 1,00,572 (+774)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 3,92,360 (+15,691), मृत 24,549 (+1,027)
  3. रशिया – कोरोनाबाधित 362,342 (+8,915), मृत 3,807 (+174)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 283,339 (+859), मृत 27,117 (+280)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 265,227 (+2,004), मृत 37,048 (+134)
  6. इटली – कोरोनाबाधित 230,555 (+397), मृत 32,955 (+78)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 182,722 (+NA), मृत 28,530 (+98)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 181,288 (+499), मृत 8,498 (+70)
  9. टर्की – कोरोनाबाधित 158,762 (+948), मृत 4,397 (+28)
  10. भारत – कोरोनाबाधित 150,793 (+5,843) , मृत 4,344 (+172)
  11. इराण – कोरोनाबाधित 139,511 (+1,787), मृत 7,508 (+57)
  12. पेरू –  कोरोनाबाधित 129,751 (+5,772) , मृत 3,788 (+159)
  13. कॅनडा –  कोरोनाबाधित 86,647 (+936), मृत 6,639 (+94)
  14. चीन – कोरोनाबाधित 82,992 (+7), मृत 4,634 (+0)
  15. चिली – कोरोनाबाधित 77,961 (+3,964), मृत 806 (+45)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 76,726 (+1,931) मृत 411 (+12)
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 71,105 (+2,485), मृत 7,633 (+239)
  18. पाकिस्तान – कोरोनाबाधित 57,705 (+1,356), मृत 1,197 (+30)
  19. बेल्जियम – कोरोनाबाधित 57,455 (+113), मृत 9,334 (+22)
  20. कतार – कोरोनाबाधित 47,207 (+1,742), मृत 28 (+2)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.