Covid 19 : कोविडची ही भीती ठायी की अनाठायी ?

एमपीसी न्यूज (हर्षल विनोद आल्पे) – सध्या टीव्हीवर बातम्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. काही बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी तर लवकरच लॉकडाऊन होणार, असे (Covid 19) आधीच जाहीर केले आहे. काही लोक आत्ताच या चिंतेत घराच्या बाहेर पडायलाही घाबरत आहेत.

टीव्हीवरील कोरोनासंदर्भातील बातम्या बघितल्या की भीती वाटते, 2020 सारखे पुन्हा तेच होणार असेल तर आपले नागरिक म्हणून काय होणार? हा प्रश्न अनेकांना पडलाय. काही लोक आत्ताच या चिंतेत घराच्या बाहेर पडायलाही घाबरत आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, ते तर भेदरलेले आहेत. सध्या असे ही काही लोक आहेत, ज्यांची मुले व्यवसायासाठी/नोकरीसाठी इतर ठिकाणी अथवा परदेशात असतात. अशा वेळी ते एकटे असलेले स्वतंत्र राहात असलेले ज्येष्ठ नागरिक यांना भविष्याची चिंता तर वाटतच आहे, पण त्याहून जास्त आपल्या एकटेपणाची अशा वेळेला जास्त भीती वाटते . त्यांचा विचार कुणी करतंय का या समाजात? सहज बातमी देणे सोपे आहे की,  केंद्र सरकार पुन्हा एकदा आपल्या देशात लॉकडाऊन चा विचार करत आहे . पण, परिणाम काय होतील ? विचार करा, एकदा…

अजूनही आम्ही 2020 च्या लॉकडाऊन मधून सावरत आहोत. आमचे कामधंदे आता कुठे सुरु होत आहेत. काही ठिकाणी तर आम्ही चांगले स्थिरस्थावर होत आहोत. (Covid 19) आम्ही आमच्या स्वप्नांच्या अगदी जवळ आहोत. आणि पुन्हा आता लॉकडाऊनची भीती?

Pune Crime : कुत्रा फिरवण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत आक्रीत घडलं, भर रस्त्यात विनयभंग

एकदाच काय ते, कायमचा जालीम उपाय करा , मान्य आहे तो तुम्ही शोधतही आहात, पण मग या भीती दाखवणाऱ्या काही माध्यमांना सज्जड दम का देत नाही की, लोकांना असे घाबरवू नका, उगाचच भीती दाखवणं हा गुन्हा आहे, तो तुम्ही करू नका, सरकारने ठणकावून सांगितले पाहिजे की, आम्ही योग्य उपायोजना करीत आहोत. शक्यतो लॉकडाऊनची वेळ येणार नाही, अशा पद्धतीने आम्ही विचार करीत आहोत. आणि तरीही काही माध्यमं चीनच्या कुठल्या कुठल्या चित्रफिती दाखवून जर भीती पसरवतच राहतील तर मात्र सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. कारण आम्ही तयार आहोत, सरकारने सांगितलेले ऐकायला आणि मास्क घालायला, पण आम्ही आता लॉकडाऊनसाठी  तयार नाही, एवढे मात्र खरे! बाजारांमध्ये, रस्त्यात, इतरत्र स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यावर हेच लक्षात येते की, लोक तयार नाहीत लॉकडाऊनसाठी! त्यांना नकोय ते संकट, होय संकटच!

आपली कामे सोडून घरी बसणे हे प्रत्येकालाच शक्य नाहीये, ज्याची रोजीरोटीच घराच्या बाहेर पडून तयार होते. तो घरी बसला/बसली तर कसं चालेल?

आपणही उगाचच गर्दी करू नये, हे मान्य, ते आपण करायला नकोच, आपण मास्क लावला पाहिजे आणि आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. (Covid 19) हे सगळं आपणच नागरिक म्हणून पाळले पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे. आपणच आपल्याला जपणे जमलेच पाहिजे. पण या काही भीती पसरवणाऱ्या लोकांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.

इतकेच सुज्ञ सरकार आणि प्रशासन  लवकरच काय तो निर्णय घेतील. फक्त आपण आदर्श नागरिक होऊन आपली काळजी घेतली पाहिजे.आणि घाबरून न जाता, या संकटाचा धीराने सामना केला पाहिजे.

लेखक : हर्षल विनोद आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.