Pune Crime : कुत्रा फिरवण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत आक्रीत घडलं, भर रस्त्यात विनयभंग

एमपीसी न्यूज : पुण्यातील बालेवाडी परिसरात सकाळी कुत्रा फिरवण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. ही महिला कुत्रा घेऊन फिरत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती या महिलेच्या समोर आला. (Pune Crime) आणि काही समजण्याच्या आत या अनोळखी व्यक्तीने या महिलेचा विनयभंग केला. बालेवाडी परिसरातील मोजे कॉलेज जवळील सार्वजनिक रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी एका 36 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या बालेवाडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहतात. 24 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो घरातील पाळीव कुत्रा घेऊन घराबाहेर पडल्या होत्या. मोझे कॉलेज जवळील सार्वजनिक रस्त्याने त्या कुत्र्याला फिरवत असताना अचानक एक अनोखी व्यक्ती त्यांच्यासमोर आली.

Pune News : …म्हणून त्या तृतीयपंथीयांकडून वैकुंठ स्मशानभूमीत जळत्या चितेजवळ अघोरी पूजा

काही समजण्याच्या आतच या व्यक्तीने स्वतःची पॅन्ट काढून गुप्तांग फिर्यादी महिला दाखवले. हा सर्व प्रकार अचानक झाल्याने फिर्यादी महिला घाबरल्या आणि त्या तिथून निघून गेल्या.(Pune Crime) त्यानंतर ही आरोपीने काही वेळ फिर्यादी यांचा पाठलाग केला. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.