Pune Crime News : गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार जेरबंद, गुडे शाखेची कामगिरी

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून 1 गावठी कट्टा आणि 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

रोहित सुरेश खंडागळे (वय 19 वर्षे, रा. रामटेकडी हडपसर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखा दोनचे पोलीस कर्मचारी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना सराईत गुन्हेगार रोहित खंडागळे हा गावठी कट्टा घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस आढळले.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गु र नं 157 /2021 आर्म अक्ट 3(25) म पो आधी 37(1)(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाईसाठी कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली स पो नि प्रकाश मोरे, वैशाली भोसले, सपोफौ आंब्रे, पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे, उत्तम तारू,कादिर शेख, गजानन सोनुने, मितेश चोरमोले निखिल जाधव यांनी केलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.