Pune news: रुग्णसंख्या घटल्याने शहरातील चार कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय

Decision to close four Covid Care Centers in the city due to declining patient numbers.

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने पुणे महानगरपालिकेने 4 कोविड केअर सेंटर आणि 9 विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात 11 कोविड केअर सेंटर आणि 16 विलगीकरण कक्ष चालवले जातात. 

मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शहरातील हॉस्पिटलमधील काही बेड अक्षरशः रिकामे पडून आहेत.

त्यामुळे कोविड केअर सेंटर चालविण्याचा खर्च मनुष्यबळाचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा विचार करता 4 कोविड केअर सेंटर आणि 9 विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाबधितांची रुग्णसंख्या 1 लाख 54 हजार 581 वर जाऊन पोहोचली. त्यातील 1 लाख 38 हजार 452 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.

त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत पुणे शहरात 12285 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 856 रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत. यातील 456 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.