Dehu road : देहूगाव येथे दीड लाखांचा पिकअप चोरीला

एमपीसी न्यूज देहूगाव मध्ये तिघांनी एक पिकअप आडवून हा आमचा पिकअप आहे म्हणत चालकाला ढकलून देत पिकअप व त्यातील कॅरेट असा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला.(Dehu road) हा प्रकार गुरुवारी (दि.1) देहुगाव येथील तळवडे चौकात घडला.

याप्रकरणी चालक गणेश आसाराम घुले (वय 22 रा.रावेत) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तीन चोरांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Dehu road : महिलेची गाडी अडवून हिसकावले मंगळसूत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिकअप (एम एच 14 सी.पी.5159) घेऊन जात असताना आरोपी लाल-काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले व त्यांनी पीकअप अडवून फिर्यादीला ढकलून देऊन हा आमचा पिकअप आहे म्हणत फिर्यादी यांच्या ताब्यातील दीड लाख रुपयांचा पीकअप (Dehu road) व पीकअपमध्ये असलेले 50 हजार रुपयांचे 245 रिकामे  कॅरेट असा एकूण 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. देहुरोड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.