Crime News : देहूरोड पोलिसांनी 8.92 लाख रुपयांचे तंबाखुजन्य पदार्थ पकडले

एमपीसी न्यूज –  देहूरोड पोलिसांनी 8.92 लाख रुपयांचे (Crime News) तंबाखुजन्य पदार्थ पकडले आहे.

 

 

सुरेश बिष्णोई, (वय 19)  व असुराम बिष्णोई, (दोघे रा. जी के बिल्डिंग, फ्लॅट नं 205, एच विंग, किवळे), सरवन बिष्णोई, (रा. कात्रज) हॆ याप्रकरणी आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 जुलैला मुकाई चौक ते विकासनगरकडे जाणारे रोडच्या उजव्या बाजूला बांधकाम चालू असलेल्या के टाऊन बिल्डिंगचे पत्र्याचे कंपाऊंडजवळ आरोपी सुरेश बिष्णोई हा त्याच्या दुचाकीवर व आरोपी असुराम बिष्णोई हा त्याच्या चार चाकी गाडीमध्ये हॆ शासनाने प्रतिबंधित केलेल्या तांबखुजन्य पदार्थ होलसेलमध्ये विक्री करताना व विक्रीच्या हेतूने त्यांच्याकडील (Crime News)  गाड्यांमध्ये साठा करून ठेवला होता. त्यांच्या ताब्यातून एकूण 8 लाख 92 हजार 672 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.