Dehuroad : अज्ञातांकडून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – पाण्याच्या टाकीजवळ थांबलेल्या तरुणावर अज्ञातांनी खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री दहाच्या सुमारास विकासनगर येथे घडली.

राहुल चंद्रमनी ओव्हाळ (वय 26, रा. विकासनगर, किवळे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रमनी हिरामण ओव्हाळ (वय 45) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी राहुल रविवारी रात्री दहाच्या सुमारास विकासनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ थांबला होता. त्यावेळी, अज्ञात आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये राहुल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.