Dehuroad News : विनापरवाना दारूची वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – विनापरवाना अवैधरित्या दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने एकाला अटक केली. त्याच्यासह त्याला दारू पुरवणा-या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 2) दुपारी मामुर्डी येथे करण्यात आली.

दिनेश बबन बोडके (वय 32, रा. शिवणे, ता. मावळ) याला अटक केली आहे. त्याच्यासह सचिन वाईन्स देहूरोडचा चालक मालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश बोडके हा त्याच्या कारमधून विनापरवाना अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा करून त्याची मामुर्डी परिसरात वाहतूक करणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दिनेश याला कार आणि दारूसाठ्यासह ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये 18 हजार 820 रुपयांच्या विदेशी दारू, बियरच्या बाटल्या आणि पाच लाख 10 हजार रुपये किमतीची एक कार जप्त करण्यात आली आहे.

आरोपी दिनेश याला देहूरोड येथील सचिन वाईन्सच्या चालक मालकाने ही दारू नियमापेक्षा अधिक प्रमाणात विक्री केल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.